पान:मयाची माया.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ प्रसंग ११ वा तो तिनें मलाच दिलीं कीं नाहीं ? त्या पांचशे रुपड्यांचं असो ह्मणा ! ते तर भलत्याच माणसानें उपटून नेले त्याला ती काय करणार ! आणखी तिच्या प्रेमाचा लाभ तरी अखेर मलाच झाला कीं नाहीं ! तेव्हां एकंदरीनें काय कीं, निरुपायानें तिच्या हातून घडलेल्या सर्व कर्मीची जबाबदारी माझ्यावांचन दुसया कोणावरही पडूं शकत नाहीं ! तेव्हां ज्याअर्थी बऱ्यावाईट परिणामाला न जुमानतां माझ्यासाठीं, माझ्या भावी सुखासाठी तिन येवढे साहस केले त्याअर्थी तिनें सांगित- लेली गोष्ट करायला आपणही तयार झालेच पाहिजे ! काय येऊन जाऊन दहा हजारच रुपये ना ! द्यावे झालं शेटजींच्या घरांतूनच सध्यां हस्तगत करून. ! तेवढ्यानेंच जर आपलं दोघांचें काम होत असले तर काय हरकत आहे तसं करायला ! पाहूं मग पुढे मार्गे तसे कारणच पडलें तर मध्यंतरी एकदां घरी जाऊन बाबांच्या तिजोरी- तला दहाबारा हजाराचा ऐवज युक्तियुक्तीनें हाताखाली घातला आणखी. तो येथें आणून त्याचे काय येतील ते पैसे शेटजींच्या घरी नेऊन टाकले म्हणजे मग काय धास्ती आहे ! हो, ठरलें, असंच करायचें ! पण सध्यां आज किंवा उद्यांच शेटजींच्या घरी चोरी केली पाहिजे याची काय वाट ! आणखी चोरी उघडकीला आली तर आपल्याला शिक्षा भोगावी लागून वाडवडिलांच्या कीर्तीला कलंक लागेल याचा विचार ! एकदां तुरुंगांत पडल्यावर पैसेही नाहींत आणखी जिच्यासाठी येवढें साहस करायवें त्या शिरीनलाही आपण मुकणार ! छे, ही भयंकर कल्पना नाहीं बोवा आपल्याला पसंत. " 66 अशा नाना प्रकारच्या परस्परविरोधी कल्पनांच्या एकसारख्या बदलत राहणाच्या तरंगानीं त्यावेळी माझें चित्त अग अमून गेले होतें; व " तूं ह्मगतेस ते आपल्या हातून कांहीं बुवा होणार नाहीं " असं मी शिरीनला सांगणार होतो; पण इतक्यात एकाएको अविचारी मनोवृत्तीच्या उच्छ्र- खलपणामुळे माझ्या तोंडांतून भलतेच शब्द निघून गेले !" प्यारी शिरीन" आपल्या खिशांत असलेल्या नोटा काढून त्या व बगलेत अत- लेली ती पेटी तिच्या हातांत देऊन मी झगालो, "सध्या हे दोन जिन्नस आणले आहेत हे घे; आगली उद्यां याववेळेला मी तुझ्या हुकुमाप्रमाणं