पान:मयाची माया.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयात्री माया. १०१ " शिरीनच्या तोंडून बाहेर पडत असलेली ही भयंकर वाक्यें ऐकतांच भी भयभीत होऊन एकाएकी माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. " कोण हे या स्त्रांचे भयंकर विचार ! माझ्यासारखा पुरुष देखील अशा विवा रांनी भिऊन जावा, आणखी त्याचे या अवलेला कांहीं देखील वाटं नये हें केवढं आश्चर्य ! बरं पण हा कांडीं हिचा सुळवा स्वभाव खास नसला पाहिजे. कारणपरत्वें हिच्या स्वभावांत कांहीं तरी विलक्षण स्थित्यंतर पडल्यामुळेच ही अशी बिथरल्यासारखी झाली असावी. तिनं सांगितलेल्या हकीकतीचा विचार केला डागजे तिच्या स्थितीत असलेली कोणतीही स्त्री असंच नाहीं कां करायची ? प्रेमाच्या मोहांत सांपड़न विचारीच्या हातून चोरीसारखें घाणेरडें कर्म व्हावं ना ! हरहर ! आणखी तं कर्म तिनं कां केले तर माझ्या प्रेमासाठी ! माझ्या दरिद्री स्थितीत मला आश्रय मिळावा; तिच्या प्रेमाचं अनुपमेय सुख मला अनुभविता यावें ह्मणून ! शिवशिव ! कोण हें नीच कर्म मी तिच्या हातून करविलें ! पण खरोखरी पाहिले तर तिनें केलेली चोरी कांहीं माझ्यासाठी नव्हती. त्या लबाड पिरोजनेंच तिला हैं घाणेरडें कर्म करायला लावलेन. मला स्वतःला कांहीं ( ती ह्मणते त्याप्र- माणे ) विलायतेला जाण्या येण्याच्या खर्चासाठी तिच्या त्या कंकणांची गरज नव्हती; किंवा तिच्या त्या पांचशे रुपायावांचूनही पण माझें आडले असल्याचे मीं तिला कधी कळविलं नव्हतं. मग असे असतांना तिनें आपल्या दुष्कर्माचे पातक माझ्या मार्थी लादून तिच्या आईबापांच्या रागाचा अनिष्ट परिणाम पर्यायाने मला भोगायला लावावें हें आश्चर्य नव्हे का ? बरं, पण मी तिचा खरा प्रियकर पिरोज नसून लबाडीने तिला भुरळ घालून वश करण्यासाठी पिरोजचे सोंग आणले आहे हे तिला माहीत नाहीं; व खरा पिरोज लंगडा होऊन कोठें तरी एखाद्या इस्पितळांत पडून राहिल्यामुळे अलीकडे त्याची तिला वार्ताही नसावी; आणि आपला पाय आतां बरा झाला असल्याचें तिला नुकतेंच कळल्यामुळे हाच आपला पिरोज अशी तिची भावना झाली असली तर त्यांत कांहीं आश्चर्य नाहीं. शिवाय दुसरे असे की, तिची तीं कंकणं, जरी तिने माझ्यासाठी चोरून आणली नसली तरी