पान:मयाची माया.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग ११ वा. शिरीनची ही हकीकत ऐकून मला थोडावेळ वाईट वाटले; पण या योगाने का होईना, ती आपल्या अगदी हातांत आली आहे असे ध्यानांत येतांच मला एकप्रकारचा आनंद झाला ! व तिला पुन्हा वचन देऊन मी सांगितलं, • शिरीन, तुं ह्मणशील ती गोष्ट करायला मी आतां अगदी एका पायावर तयार झालों आहे ! तूं हुकूम करण्याचाच काय तो अवकाश !" " अगवाई, असं असल्यावर मग आणखी ते काय पाहिजे ! आतां तुझी अगदी माझ्या हातांत आलति ! आतां रुध्यां तुझाला येवढंच सांगतें कीं, आज जशी ती माझी कंकणं, आणखी पांचशे रुपये माझ्या साठी हाणून तुझी आणिलेत- ते तर आउद्या मी आईकडे पाँचते करवितेच ह्मणा; पण -- तसेच उद्याच्या उद्यां पाहिजे त्या युक्तीनं तुझी, फार नाहीं, पण एक दहा हजार रुपये घेऊन या झणजे आपण लागडीच उद्यां रात्रीं येथून निघून लांबच्या अशा कुठल्या तरी गांवांत जाऊन राहूं ! आणखी तुझी नहमी जवळ असलांत झणजे मग आईची किंवा बाबांची मला मुळी दिखील गरज नाहीं ! बसा ह्मणावं स्डत ! पण है काम उद्यांच्या उद्यां झालं तर उपयोग. तुमच्यापाशी इतके पैसे नाहीत हे मला चांगलं ठाऊक आहे; पण तुमच्यासाठी मी जशी दोनदां चोरी केली तशी तुझी आतां एकदाच माझ्यासाठी ह्मणन - नुसती माझ्यासाठी नाहीं; आपल्या दोघ. च्यासाठी चांगली भली भक्कम चोरी करा-- नव्हे तुम्हाला केलीच पाहिजे ! हवं असलं तर मी तुझाला ठिकाण सुद्धां सांगते. ज्या माणसाकडून तुझी आज पांचशे रुपये मागून आणलेत; त्याच्याच घरी जाऊन उद्यां तुझी येवढं करून या. तुझी त्याच्या येथे येत जात असाल; पण तो किती श्रीमंत आहे हे तुझाला माहीत नसेल ! अहो, दहा हजार रुपये म्हणजे नुसता त्याच्या कोपऱ्यांतला केर आहे असं समजा ! त्याच्या घरची सारी माहिती मी गुप्तपणानं मिळविली आहे ! तुम्ही दहा हजार रुपये आणिलंत -- पण अगदी कसे आणाल म्हणता, की कुणाला म्हणून त्याची कधी बातमी लागू नये आणली तम्हाला पकं सागते की, त्याच्या तर ही गोष्ट कधींच लक्षांत यायवी नाहीं- म्हणजे मग तुमचा तो दरिद्रीपणा नको; आणखी माणसांना निर्द- यपणानं कांपायचा तो डाक्तरीचा धंदाही नको ! " -