पान:मयाची माया.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मयाची माया. " ह्मणजे ? तुझ्या या अशा संदिग्ध बोलण्यानं मीं काय समजावं ? यापेक्षा अधिक स्पष्टरीतीनं सांगशील तर बरं होईल. " ‘ आणखी स्पष्ट काय सांगायचं आहे त्यांत ! हे पहा, आईचं आणखी बाबाचं मन माझ्याबद्दल अगदी विटून गेलं आहे. यापुढे ते आतां माझ्यावर पहिल्यासारखी माया करितील; आणखी माझं ह्मण जे त्यापासून हित होईल याचं आतां नांवच नको ! आणखी इतकं हे सगळं व्हायला कारण काय तर तुमच्या ठिकाणी जडलेल्या माझ्या प्रेमाचं वेड ! त्यादिवशी रात्रीं तुमच्या नादी लागून तुमची गरिबी आहे तेव्हां विला- यतेंतून शिकून येण्यासाठी ह्मणून तुह्माला आईच्या नकळत आपलीं हिन्यांची कंकणं द्यायचा जर मला मोह पडला नसता तर आज माझी. अशी दशा होण्याचं कांहीं तरी कारण होतं कां ? बरं दुसरी गोष्ट अशी कीं, आईनं कांहीं कारणासाठीं ह्मणून माझ्यापार्शी पांचरों रुपये ठेवा- यला दिले होतेन. ते रुपये दुसऱ्या दिवशीं तिच्या एका मैत्रिणीकडे नेऊन द्यायला तिनं मला सांगितलं होतंन; पण तुमच्या मरिचत तुम्हालाच त्याचा अधिक उपयोग होईल असं माझ्या वेड्या मनानं ठरविलंन आणखी ते पांचशे रुपये तुमच्याकडे पोंचवायला ह्मणून. मी एका माणसापाशीं दिले. पण त्या माणसानं मधल्यामधेंच ते लांबविले असं मला दुसऱ्या दिवशी कळलं ! आणखी आमच्या एका चोंबड्या मोलकरणीनं ही गोष्ट लागलीच आईला जाऊन सांगितलीन. तेव्हां असं झालं असतांना माझ्या स्वच्छंदीपणाचे आणखी तो स्वच्छंदी- पणा केवळ तुमच्या प्रेमासाठीं बरं ! - दोन वेळां असले चमत्कारिक अनुभव आल्यावर आईनं आणि बाबांनी माझ्या कुवारपणाच्या स्थितीत असल्या बाणेरड्या अपराधाकडे डोळेझांक तरी कशी आणखी किती. दिवस करायची ! झटलं ह्मणजे या साऱ्या दोषाचे धनी तुझीच आहां ! तुझीच मला असल्या वाईट मार्गाला लाविलंत ! नाहीं तर असल्या चोग्या करण्याचं आणखी निर्लज्जागानं आईचापापाशीं खोटं खोटं कांहीं तरी सांगण्याचं धाडस माझ्याकडून कसं झालं असतं ? तेव्हां तुझी माझ्या जन्माचं मातेरं केलंत तर आतां मी सांगेन तसं तुमा अ बागलं पाहिजे ! ”