पान:मयाची माया.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग ११ वा. जाणाच्या त्या निरनिराळ्या वाटा आहेत ! कोणत्याही वाटेनें गेलें तरी एकच ! बरें देश ? जेथें आपण राहूं, जेथें सुखानें आपल्याला राहतां येईल तो आपला देश ! अमक्या मनुष्याचा अमकाच देश अशी परमे- श्वरानें थोडीच वांटगी केली आहे ! आणखी नांवलौकिक ? अं: ही वस्तू तर अगदींच ढिसूळ ! तिच्या नाहीं कोणी लागावें ! ती तर देशकाल - परिस्थितीनुरूप बदलणारी आहे ! संपन्न स्थितींतला मनुष्य कोणत्याही रीतीनें वागला तरी नांवलौकिक आपोआप त्याच्या मार्गे धाव घेत असतो. आज जी माणसें नांवलौकिकाला चढलीं आहेत तींच पूर्वी कधीं तरी पाहिजे तें कर्म करणारीं होतींच कीं नाहीं ! एखाद्या अट्टल चोरानें मोठी थोरली चोरी करून ती पचविली व तो गबर होऊन ऐटीनें वागूं लागला झणजे त्याच्या नांवाला लागलेला डाग कालांतरानें आपोआप नाहींसा होऊन तो चोर नांवलौकिकाला चढल्याशिवाय रहात नाहीं ! पण कोण- तेही काम अगदी बेमालुम मात्र केले पाहिजे. सारांश, एकंदरीनें या सर्व गोष्टी पाहिजे त्या माणसाला सहज करितां येण्यासारख्या आहेत. पण शिरीनसारखी अप्सरा हवे तसे यत्न केले तरी मिळणार नाहीं ! तेव्हां ती ज्याअर्थी आपल्या हाती आली आहे त्याअर्थी बाकींच्या शुष्क गोष्टींचा विचार करण्याचे आपल्यासारख्याला मुळींच कारण नाहीं ! येवढे थारले मोठमोठे देव; पण त्यांनी सुद्धां सुंदर स्त्रियांसाठी पाहिजे तें करायला मार्गे पुढे पाहिले नाहीं; मग आपली काय कथा ! आपण हवं तें केलें ह्मणून काय हरकत आहे? अशा प्रकारच्या आत्मघातकी विचारांचे माझ्या दुर्बल मनावर एका- एकी विलक्षण वर्चस्व स्थापित झाल्यामुळे मी सर्वस्वी शिरीनच्या प्रेमा- धीन होऊन तिला ह्मणालों, " मी काय केलं ह्मणजे माझ्याबद्दलची तुझ्या मनांतली शंका फिटेल ? " 66 शिरीनची चर्या आतां अगदी प्रफुल्लित होऊन तिनें गालांतल्या गालांत हंसून लाजत लाजत उत्तर दिलं " तुमच्या स्वार्थाला जसे तुझी जपत आहां तसेच माझ्या स्वार्थालाही तुझी जपला ह्मणजे झालं; याहून दुसरं माझं कांहीं ह्मणणं नाहीं ! "