“सोन्ये, दार लाव बेटा.” इंदुमती म्हणाली.
“आज हवेत गारठा आहे.” म्हातारबाबा म्हणाले.
“तुमच्या झोपडीत तर अधिकच थंडी लागत असेल आणि भरपूर पांघरूणही नसेल. खरं ना सोन्ये ?” संपतरायाने विचारले.
“आम्ही चुलीत विस्तव ठेवतो. त्यामुळे ऊब असते आणि बाबांचं प्रेम आहे ना. त्यांनी नुसता हात माझ्या पाठीवरून फिरविला तरी थंडी पळते. प्रेमाची ऊब ही खरी ऊब.” सोनी म्हणाली.
“आणि तुम्हीही मधूनमधून मदत करता. सोनीची चौकशी करता. मी तिच्यासाठी घेतलं आहे पांघरूण. तुम्ही किती उदार. खरोखरच तुमची श्रीमंती तुम्हांला शोभते. तुमची श्रीमंती म्हणजे जगाला शाप नसून जगाला आशिर्वाद आहे. वास्तविक सोनी कुठची कोण. एका अनाथ स्त्रीची अनाथ मुलगी. लोक तर अशांचा तिरस्कार करतात, परंतु तुम्ही त्या दिवशी स्वतः सोनीला आपल्या घरी बाळगण्यास तयार झाले होतेत. मला ती गोष्ट आठवते आहे. पंधरा-सोळा वर्ष झाली. त्या वेळेस मी सोनीला घट्ट धरून म्हटलं, ‘नाही. मी ती कोणाला देणार नाही. ती माझ्याकडे आली. माझी झाली.’ तुम्ही ‘बरं’ म्हटलंत. तत्काळ दहा रूपये मदत म्हणून दिलेत आणि नेहमी चौकशी करता. थोर आहात तुम्ही. सोनी तुम्ही नेली असतीत तर माझी काय दशा झाली असती ? सोनीमुळे माझ्या जीवनात आनंद झाला. माझा पुनर्जन्म झाला. ही पंधरा वर्षे किती सुखात गेली! ती पंधरा वर्षं व ही नंतरची पंधरा वर्षं;दोघांत किती फरक ? सोनीनं मला कृतार्थ केलं.” मनूबाबा प्रेमाने सोनीच्या पाठीवरून हात फिरवून म्हणाले.
“सोनीनं कृतार्थ केलं. आता आम्हाला कृतार्थ करू दे.” संपतराय म्हणाले.
“म्हणजे काय ?”, म्हाताऱ्याने भीतभीत विचारले.
“मनूबाबा, आज इतक्या रात्री आम्ही दोघं तुमच्याकडे का आलो माहीत आहे ? आहे काही कल्पना ? ”
“थंडी पडली आहे, सोनीला पांघरूण वगैरे आहे की नाही पाह्यला आले असाल. किंवा देण्यासाठी बरोबर एखादं लोकरीचं पांघरूण घेऊन
सोनीचा नकार * ५५