पान:मनतरंग.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लागते. आपण निर्माण केलेल्या मुलांना जगाची ओळख करून देण्याची, त्यांना चांगल्या रीतीने जगण्याचे रस्ते दाखवण्याची जबाबदारी आई आणि वडील या दोघांचीही असते. अशा काळात व्यावसायिक प्रगती... सहजपणे मिळवता येणारा पैसा... यश या सर्वांना काही काळ दूर सारावे लागते. ही जबाबदारी 'बापा'ची असतेच. त्याने पत्नीला पूर्णत्वाने सहयोग द्यायचा असतो. परंतु तरीही निसर्गाने सोपवलेली जबाबदारी 'बांधीलकी' मानून स्त्रीने, आईने स्वीकारायची असते. त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही आणि तसे झाले तर...?
 ऐन उमेदीत नकळत वाट चुकून कड्यावरून कोसळणाऱ्या लेकरांची संख्या वाढत जाणार... !!

■ ■ ■

कदाचित् हे तुम्हाला पटणार नाही / ८१