पान:मनतरंग.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होते. एस.टी.बस थेट गावापर्यंत जाणारी. मॅडमची राखण न देता मुलींना शिबिरासाठी पाठवले.
 आणि आज त्या नवा आत्मविश्वास घेऊन माझ्यासमोर उभ्या होत्या. मैत्रीचा अदृश्य बंध जणू आमच्यात निर्माण झाला होता.
 "मॅडम, काही मुली येताना अगदी साध्यासुध्या कपड्यात होत्या. शिबिरात आल्यावर मात्र जिन्स, स्कर्ट नि चेहरे इथून तिथून रंगवलेले असा अवतार. मुलं पाहिली की मुरडत चालणं आणि एकीमेकींना टाळ्या देत हसणं, मग काय? मुलंही त्यांच्यामागे. शेकोटी भोवती गाणी म्हणताना दोघींनी तर हात धरून 'तू हाँ कर या ना कर, तू मेरी किरन' हे गाणं म्हटलं. शी..."
 "अगं तुम्ही समूहनृत्य केलंत ना मुलांचं सहकार्य घेऊन ? घराच्या चौकटीबाहेर गेलं की मनही मोकळं होतं. ते स्वैर होऊ नये, याची काळजी घ्यायची."
 "मॅडम आम्ही आमचा गट सोडलाच नाही. मुलं सुद्धा माणसंच की ! इथल्या कॉलेजची मुलंही आमच्यात सामील झाली. खूप गाणी म्हटली नि शिकवली आम्ही.

"ये वक्त की आवाज है मिलके चलो...
अमन के हम रखवाले एक है. एक है ।..."

 गाणी खूप आवडली सगळ्यांना. मग काय, रोज कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आमचे समूहगीत होणारच. 'एक गोष्ट मात्र खूप बोचली !

"ले कंधोंपर आधा आकाश
सर को उठाते चले
हम विश्वकी महिला इक्किसवी सदी की ओर चले ।"


 "हे गाणे झाल्यावर मात्र खूप चर्चा झाली. आपण स्त्रिया माणसं आहेत, पुरुषांसमान आहोत हे कुणाला पटतच नाही अगदी सरांना सुद्धा.
 "स्त्रियांना बुद्धी आहे. पण ताकद ? शक्ती नाही आणि धाडसही नाही. जन्मत:च स्त्रिया सशासारख्या भित्र्या असतात. हे सरांचं म्हणणं. मग सरांशी वाद घातला आम्ही. रेखीनं छान अडवलं सरांना. ती म्हणाली, "आम्हाला समाज

मनतरंग / ५०