पान:मनतरंग.pdf/३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 तर अशी ही अक्षय समृद्धीच्या शुभेच्छा देणारी वैशाखी तृतीया, स्त्रियांना विशेष पूजनीय वाटते. कारण वैशाखाचे चटके सोसल्याशिवाय हिरवाईची तृप्ती जीवनात बहरत नाही हे स्त्रीच जाणते. कारण तिचे जिणेच जणू असे,

वैशाखाच्या वणव्याला
घेत्ये पदरी बांधून
इवल्याशा पानांवर
देत्ये श्रावण गोंदून...
दोन रंग दोन पोत
सुई-दोऱ्याने ओविले
गंगाजमनी ह्यो शेला
नावं नई ठिऊ यालो...!!"

■ ■ ■

मनतरंग / २४