पान:मनतरंग.pdf/३०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

  भूमीतून निर्माण होणाऱ्या अन्नाशी; वनस्पती, कंदमुळे, शाकभाजी, धान्य, फळे, फुले यांच्याशी आकाशातून बरसणाऱ्या पाऊसधारांचे नाते जेवढे जवळचे तेवढेच घनिष्ठ नाते सूर्याचे असते. सावनी ऊनाचा रेशमी स्पर्श कवींना प्रेमिकांना आवडत असला तरी भूमी मात्र ऐन ग्रीष्मातल्या सूर्याच्या दाहक स्पर्शाची वाट पाहात असते. कुसुमाग्रजांनी पृथ्वीच्या प्रेमगीताची गाथा लिहिताना म्हटलेय,

नको क्षुद्र शृंगार तो दुर्बलांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे...

 पण सूर्याच्या दूरतेतूनच पृथ्वीचा शृंगार सजतो. सूर्याला 'अपागर्भ' म्हटले आहे. 'आपःसूर्ये समहितकाः' असे तैतरिय अरण्यकात (१.८.१.) म्हटले आहे. सूर्य हा धन्वन्तरी असून त्याचे बिंब हा अमृतकलश आहे. या कलशातून बाहेर पडणाऱ्या जलात औषधी गुण असतात अशी श्रद्धा आहे. पृथ्वीवर पावसाच्या रूपाने येणारे जल...पाणी; सूर्यमंडलातून येते अशी फार प्राचीन कल्पना आहे. म्हणूनच सूर्याला 'सरस्वान' म्हटले आहे. ज्याच्यात 'रस'...ऊर्जाजल आहे असा 'स-रसवान सूर्याला बीजस्वरूप मानले आहे. 'अपागर्भ' या संकल्पनेचा अर्थ

मनतरंग / २२