पान:मनतरंग.pdf/२९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनात होताच आणि चकचुकती पालही. पण प्रत्यक्षात वसंतबहरांनी लखलखलेली देखणी झाडे. पायाशी विसावलेल्या व्यक्तींच्या फक्त मधुर आठवणींचीच याद देत होती. तऱ्हेतऱ्हेच्या फुलांचे झुलते वाफे त्या कबरींच्या भवताली हिंदोळत होते.
 …हे सारे पाहून आठवतो अनुपम खेर या विलक्षण बुद्धिमान आणि भावविभोर नटाचा चित्रपट, 'सारांश'

 …शेवटी आपल्या 'असण्या'चा अक्षय, अभंग 'सारांश' किती अनंत आणि अपार ना?

■ ■ ■

बहरता सारांश! / २१