पान:मनतरंग.pdf/२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जमिनीची सुफलनशक्ती वाढावी यासाठी पाऊसकाळात विविध प्रकारचे यातुविधी कल्पनेनुसार निर्माण केले. भूमी आणि स्त्री या 'निर्मिती' करणाऱ्या, त्यामुळे यातुविधित स्त्रीप्रधानता असावी.

 आपल्या अतिविशाल संस्कृतीची मुळे लोकव्रते, सण, विधी यांत खोलवर पसरलेली आहेत. आज निरर्थक वाटणाऱ्या विधिव्रतांमधील अवैज्ञानिक, सामाजिक न्यायाशी विसंगत बाबी फेकून द्यायलाच हव्यात. पण त्यांच्या निर्मितीमागील कल्पनाबंध, लोकभाव शोधून त्याला नवे रूप देणेही अत्यावश्यक आहे. फलोत्पत्ती करणारे वृक्ष आणि मानववंश निर्माण करणारी स्त्री यांच्यातले आदिम नाते कागदी, कचकडी होत गेले तर येणाऱ्या पिढ्यांना तिसरे सहस्त्रक पाहायला मिळेल का?

■ ■ ■

मनतरंग / १८