पान:मनतरंग.pdf/२७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'माँ, पंजिमाँ अंगणात फुललीय. चल ना पाहायला... चल गंऽऽ' माझा हात ओढत माझी नातवंडे मला सांगत होती. खरे तर मे महिन्याचे पाऊल अंगणात पडण्यापूर्वीच मला त्या लालचुटूक नि शुभ्र स्वप्निल रेषांच्या उत्फुल्ल गेंदेदार भुईफुलोऱ्याचे स्वप्न पडू लागले होते. नऊ वर्षांपूर्वी आई माझ्या घरी आली होती. १० मे हा तिचा जन्मदिवस आणि विवाहाचा दिवस. ही तारीख जवळ आली की, ती काहीशी अस्वस्थ होई. मला माझ्या एका परदेशी मैत्रिणीने त्या गेंदांचे कंद दिले होते. आईची अस्वस्थता जावी नि त्या खास दिवसाची आठवण म्हणून भिंतीला टेकून मी ते कंद मातीत रोवायला लावले तिला.
 दिवस मावळतीला आला नि तिच्या छातीत दुखू लागले भोवंड आल्यागत झाले. नंतरचे पंधरा - वीस दिवस नुसत्या काळजीचे नि भरून आलेले. पण त्यातून ती छान सावरली. हातीपायी धडधाकटपणे घरी गेली. ते कंद आमच्या डोक्यातून तर कधीच निसटून पार झाले होते. नंतरच्या वर्षी भर मे मध्ये तिचे आजारपण आणि जुलैत सर्वांचा निरोप घेऊन पल्याड जाणे...

 त्र्याण्णवचा मे उजाडला नि एक दिवस लक्षात आले. भिंतीच्या लगत खोवलेल्या त्या कंदातून हिरवी ठसठसीत उभार कळी थेट जमिनीतून डोकं वर

बहरता सारांश ! / १९