पान:मनतरंग.pdf/२३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. विचार करुन निर्णय घेण्याची, संकटांना समोर जाण्याची मनःशक्ती तिच्याकडे आहे, याची नोंद आजवर घेतलीच गेली नव्हती. पण शिक्षणाचा आणि तर्काचा तिसरा डोळा ज्यांना लाभला अशा थोर पितृतुल्य महर्षीनी एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापासून हजारो वर्षे शिळा होऊन पडलेल्या 'अहिल्ये'तील माणूसपणाचा रुणझुणता जिवंत झरा समाजासमोर आणण्यासाठी परिश्रम घेतले. गेल्या दीडशे वर्षात स्त्रियांनीही स्वत:चे बौद्धिक, शारीरिक, मानसिक कर्तृत्व जगासमोर सिद्ध केले. तरीही शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर जायला स्त्रीला मनाई ? केवळ परंपरा म्हणून ? रूढी म्हणून ? असे धरून चालूया की शनीचा कोप होईल. त्या चौथऱ्यावर चढणाऱ्या स्त्रिया जर कोप सहन करायला तयार असतील तर ? मग कोणाचा अडसर ? 'काही' माणसांचाच ना ?
 'शनी' जर परम ईश्वर आहे तर तो स्त्रीच्या स्पर्शाने अपवित्र होईलच कसा ?... की इथेही राजकीय शनीमाहात्म्य ?....

■ ■ ■

शनिमाहात्म्य.../१५