पान:मनतरंग.pdf/२१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



"स्त्रीयः पवित्रमतुलम्
नैनंदुष्यन्तिकर्हिचित्
मासिं मासि रजोह्यासां
दुष्कृतान्यपकर्षति"

स्त्रिया मूलत:च पवित्र आहेत. त्या कशानेही अपवित्र होत नाहीत. दर महिन्याला त्यांच्यातील 'रज'...बाहेरून आलेली मलिनता नाहीशी करण्याची शक्ती निसर्गानेच त्यांना दिली आहे. अशी स्त्रियांच्या पावित्र्याची ग्वाही देणारा पंडित वराह मिहीर सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी 'स्त्रीशक्ती' ची अतुलनीय महती सांगून गेला.

 महात्मा चक्रधरांचे शिष्य गोविंदप्रभू रजःस्वला स्त्रीस भोजन तयार करण्यास सांगत आणि अन्नातील एक घास खाऊन इतर अन्न प्रसाद म्हणून इतरांना... शिष्यांना देत.

 स्त्रीची मासिक पाळी म्हणजेच तिच्यातील निर्मितीची शक्ती. तिच्या स्त्रीत्वाची खूण. 'स्त्री' त ही शक्ती आहे. म्हणून जगाचा रहाटपाळणा लाखो वर्षांपासून अव्याहतपणे फिरतो आहे. या सत्याची जाण आणि भान अदिमानवाला

शनिमाहात्म्य... / १३