पान:मनतरंग.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाले. गर्भ पाडून घेण्यासाठी शहरात गेली. घरच्यांना कळले. त्यांनी घरातून हाकलून दिले. या बाईचा पत्ता शोधीत आमच्या तालुक्याला आली. कॉलेजही करते नि हा धंदाही ! मुलगी हुशार आहे. पश्चात्ताप झालाय. तिच्याशीही बोला. या मार्गातून दूर जाण्याची, कष्ट करण्याची इच्छा दोघींना दिसतेय. मीही मदत करायला तयार आहे. चुकीच्या वाटेन पुढे जाण्याआधी दोन पावलांतच मागे फिरल्या तर उद्याचे जीवन बरे जाईल... ताई दिवाळीनंतर भेटतो. प्लीज विचार

करा..."
 सामाजिक न्यायाची जाणीव ठेवणारा पोलीस अधिकारी पाहून मलाही कौतुक वाटले.
 पण काय उत्तर आहे आमच्याजवळ ? शिक्षण आणि जगणे यांचे नाते आहे का शिल्लक ? अशा असंख्य शिक्षित स्त्रिया आहेत. पण ते शिक्षण म्हणजे... त्यात जगण्याच्या रीती, नीती यांचा ताळमेळ आहे का ?
 ज्या देशात दोन वेळच्या भाकरीसाठी 'शील' विकावे लागते त्याला 'राष्ट्र' म्हणायचं का?

■ ■ ■

मनतरंग / १६८