पान:मनतरंग.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 दसरा जवळ आला की, फटाक्याचे आवाज घुमू लागतात. यंदा तर राजकीय दसरा-दिवाळीही त्याच सुमारास आली होती. आनंदाचे-उत्सवाचे तुफानही आगदी दोनशे पन्नास किलो मिटर्सच्या वेगाने धावले. हा आनंद स्वाभाविक आहे हे खरेच. पण तरीही या आनंदाला स्पर्श असलेल्या करुण ओल्या कडांचे भानही आपण सामान्य माणसांनी ठेवायला हवे.
 ओरिसाच्या समुद्रकिनाऱ्याला बेभान वादळी झंझावाताने झोडपून काढले. त्यात नद्यांच्या पुराचे थैमान. चाळीस फुटांपेक्षाही उंच समुद्री लाटांनी किनाऱ्यावरच्या गावांना बेसहारा केले. एक कोटी माणसे या वादळाने बेघर झाली आहेत. आमचे जवान केवळ कारगिल सीमेवरच लढून देशाचे रक्षण करीत नाहीत तर नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या जीवांना मृत्यूच्या दाढेतून काढण्याचे कामही तेच करतात आणि तेही अत्यंत शिस्तीत. भूकंप झाल्यानंतर सैन्यातील अधिकाऱ्यांसमवेत जवानांनी केलेल्या कामाचा झुंजार वेग, त्यातील शिस्त जवळून पाहता आली होती. हे सगळे खरे पण आम्ही आमच्या दिवाळीच्या चैनीत, फटाक्यात थोडी काटकसर करून ओरिसातील बांधवांसाठी मदत पाठवणार आहोत का ? क्लिंटन यांनी अकरा कोटी डॉलर्स दिले. ते महत्त्वाचे आहेच. पण तरीही

...या ओल्या...करुण कडांचेही भान हवे! / १६३