पान:मनतरंग.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणून मी दरवर्षी आईंना त्रास देतो आहे, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी विद्यार्थ्यांची प्रशस्तीपत्रे जोडावी लागतात आणि मुख्याध्यापकांची शिफारस. मग जो शिक्षक त्यांना खुश करील तो 'उत्कृष्ट.' आई पुरस्कारापेक्षा ही योग्य आहेत. पुन्हा नाही मी या कामासाठी येणार..."
 पूर्वी पुरस्कारांचे समाजाला कौतुक होते. आजकाल पुरस्काराच्या बातम्या इतक्या जागोजाग असतात की वाचणाराही ती बातमी टाळून पलीकडे जातो. माझ्या ओळखीचे गृहस्थ सांगत होते की, 'हूज हूँ' सारख्या संग्रहात तीनशे डॉलर्स रजिस्ट्रेशन फी देऊन 'नाव' येऊ शकते. तर पुरस्काराची ही कहाणी. अवमूल्यन कशाकशाचे करणार आम्ही ?

■ ■ ■

पुरस्कारांची कहाणी/ १४७