पान:मनतरंग.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 शाळेत असताना श्रावणाची आणि ऑगस्ट महिन्याची आम्ही मनभरून वाट पाहायचो. श्रावण आणि ऑगस्ट यांची आगून-मागून जोडी असतेच. यंदा अधिकाचा ज्येष्ठ होता तरीही बारा ऑगस्टपासून श्रावण सुरू झाला. श्रावण आला की बालकवी आठवणारच !

"श्रावणामासी हर्ष मानसी -
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सर सर शिरवे -
क्षणात फिरूनि ऊन पडे ॥"

 त्या पाऊसधारातून आरपार जाणारी सूर्यकिरणे. मग निसर्गनियमानुसार इन्द्रधनूचा गोफ आकाशात विणलाच जाणार ! श्रावण आला की नागपंचमी, नारळीपौर्णिमा, पोळा हे सण आले. श्रावणी सोमवारची मजा तर औरच असे. श्रावणी सोमवारी शाळा सकाळी असे. शाळा सुटली की आम्ही साळकाया माळकाया पांझरा नदीच्या काठाने रमतगमत थेट जमनागिरीच्या शिवमंदिरात जात असू. तिथे वडाखाली बसून डब्यातली शाबुदाण्याची खिचडी...उसळ खायची,

आठवणींचे रंग सावनी / १३९