पान:मनतरंग.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 भारतीय सैन्याच्या विमानदलात आता मुलीही प्रवेश घेऊ लागल्या आहेत भारतीय विमानदलाचे प्रमुख, टिपणीस यांच्या हातून लेफ्टनंटचा हुद्दा स्वीकारणारी अनिता आपटे अत्यंत धीटपणाने दूरदर्शनच्या प्रतिनिधीशी बोलताना पाहिली आणि मन गर्वाने ताठ झाले.
 गेल्या तीन-चार हजार वर्षांच्या काळात स्त्रियांना जीवनातील कोणत्याच क्षेत्रात संधी दिली नाही. किंबहुना त्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बळ असतात ही ठाम समजूत आमच्या भारतीय समाजमनात घट्ट रुजली आहे. खरे तर प्राचीन काळीही युद्धात स्त्रिया सहभागी होत असत. कैकयी राजा दशरथाबरोबर युद्धावर जात असे. राजघराण्यातील स्त्रियांना शस्त्राचे शास्त्र अवगत करून दिले जाई. परंतु नंतरच्या काळात स्त्रियांच्या सौंदर्याचा,देहाचा उपयोग युद्धात करून घेतला गेला. 'विषकन्ये' ची कथा सर्वश्रुत आहे बालपणापासून एखाद्या कन्येला विषाची मात्रा दिली जाई. तरुणपणात प्रवेश करीपर्यंत ती परिपूर्ण 'विषकन्या' होत असे, तिच्या सौंदर्याचा विषारीपणाचा उपयोग शत्रूराष्ट्राचे अधिकारी फोडण्यासाठी, त्यांची गुपिते हस्तगत करण्यासाठी केला जाई. परंतु अशा पद्धतीच्या उपयोगात स्त्रीच्या केवळ देहाला महत्त्व दिले जाई. युद्धशास्त्रातील

मनतरंग / १३६