पान:मनतरंग.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रणगाडे भिडवले. भारतीय संस्कृतीचा गाभा माणुसकीचा आहे. आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवून आम्ही, पुनश्च आमच्या सीमेवर परतलो. पण या युद्धात एक नीतिमान, अत्यंत सुजाण पंतप्रधान गमवावे लागले.
 त्यानंतर अवघ्या सहा वर्षात पाकने बांगला देशवर चढाई केली. ती तर आम्ही सहजपणाने परतवून लावली. भारताच्या रणवीरांनी बांगलादेश स्वतंत्र केला. पण बाहेरच्या राष्ट्रांनी आमची सीमा नेहमीच धगधगती ठेवली. कधी शिखिस्तानला उचलून धरून तर कधी श्रीनगरमध्ये आतंकवाद्यांना घुसवून. आज सुमारे २८ वर्षानंतर, भारतातील लोकशाहीवादी सरकार अवघ्या एका मताने पडल्याचा आणि भारतीय पंतप्रधान या मातीतून उगवलेला असावा की परकीय असावा या राजकीय वादाचा फायदा घेऊन, पाकने हजारो भाडोत्री आणि काही घरातले घुसखोर कारगिल, पूंछ, द्रास सीमेवरून भारतात घुसवले. १९६२, १९६५, १९७१ साली भारताच्या विशाल एकात्म मनाने नैतिक बळ जवानांना दिले होते.
 धारातीर्थी पडलेल्या जवानांची अर्थी... त्यांच्या पत्नीचे भकास डोळे... आईवडिलांचे दुर्दम्य मनोबल टी.व्ही. वरून पाहात असताना पुन्हा मनात ओळी उगवतात...

"कोई शीख कोई जाट मराठा
कोई बंगाली कोई मद्रासी
सरहदपे मरनेवाला हर वीर था भारतवासी..."


■ ■ ■

हर वीर था भारतवासी!/१२९