पान:मनतरंग.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सौरव...मनोज...अजय...नचिकेत असे अनेक. कुणाचे वय पंचवीस तर कुणी सत्तावीस, कुणी नुकतीच पस्तिशी ओलांडलेला. कावऱ्या बावऱ्या नजरेने त्या लाकडी पेटीकडे, फुलांच्या चक्राने सजलेल्या लाकडी पेटीकडे पाहणारी पाच सात वर्षांची चिमुकली मुले. त्यांना घट्ट पकडून उभ्या असलेल्या कोऱ्या कपाळाच्या तरुण सौभाग्यवती. रडता रडता मुलाच्या मृत्यूने उद्ध्वस्त झालेले मन मोकळं करणाऱ्या आया...
 हे सारे दूरदर्शवरून पाहताना डोळे भरून येतात, रक्ताच्या ज्वाला होऊन उसळू लागतात. १७ हजार फूट उंचीवर बर्फाच्या माऱ्यात, भूक...भावना लाथाडून कारगिल खोऱ्यात घुसलेल्या घुसखोरांना हुसकावून भारताच्या हद्दीबाहेर घालवण्यासाठी सर्वस्व समर्पून लढणाऱ्या तरुण भारतीय रणवीरांच्या पाठीवरून मायेचा हात फिरविण्यासाठी, मन धावू लागतं. भारतातील, स्त्रिया 'विदुला' आहेत. विदुला... रणांगणातून पळून आलेल्या मुलाला...संजयला मृत्यूला कवटाळण्यासाठी धाडस देऊन परत पाठवणारी आई. पण काळाबरोबर आम्हीही बदललो आहोत. जोहार करणाऱ्या स्त्रियांपेक्षा प्रत्यक्ष रणभूमीवर जाण्यासाठी सिद्ध असलेल्या तरुणी आज तयार आहेत. पूर्व वैदिक काळात विश्पला ही

मनतरंग / १३०