पान:मनतरंग.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातला 'जागतिक चषक-वर्ल्डकप' स्पर्धेचा सामना रंगात आलेला. नव्यानेच या क्षेत्रात प्रवेश करणारा बांगलादेशसारखा संघ, पाकिस्तानसारख्या बलदंड संघाला जेरीस आणतोय हे पाहून प्रेक्षकांना स्फुरण चढलेले. एकजण, टी.व्ही. पाहणाऱ्याला ओरडला.
 "अरे, जरा कारगिलकी न्युज भी देखो. झी न्यूज लावा. बघा कारगिलला काय चाललं ते !"
 "यार पाकिस्तानको भी अभीच टाईम मिला क्या ? बघ बाबा घुसखोर कारगिलमध्ये किती आत घुसले ते ?" दुसरा पुष्टी देतो, "फर्नाडिसबाबाला कोणता डास चावला रे ? आपण तर यार त्यावर लई खूश होतो. पण अशात काहीही उलटसुलटं बोलायला लागलेत हे फादर !" तिसऱ्याची टिप्पणी. गेल्या पंधरा दिवसांपासून टी.व्ही. वर क्रिकेट...द्रविड...सचिन...गांगुली यांची चलती आहे.
 तरुणपिढीचे हे संवाद ऐकताना माझे मन थेट सदतीस वर्षे मागे गेले. माझ्या पिढीने तरुणाईत पाऊल नुकतेच रोवलेले होते. आपला देश, राष्ट्र, संस्कृती यांच्याबद्दलच्या भावना अतिशय तजेल, संवदेनशील होत्या. स्वातंत्र्यानंतर

हर वीर था भारतवासी!/१२७