पान:मनतरंग.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

  २७ जानेवारी १९९५ ची संध्याकाळ. आजही आठवत राहणारी. महिलांच्या सर्वांगीण सबलीकरणासाठी बंगलोरमध्ये परिषद भरली होती. अनेक व्यक्ती आपल्याला शब्दांच्या, चित्रांच्या, गीतांच्या... माध्यामातून भेटत राहतात. पण त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा... पाहण्याचा... ऐकण्याचा सुनहरी योग आला की मन अगदी तृप्त होते.

"तू खुदको बदल, तू खुदको बदल
तबही तो जमाना बदलेगा
तू बोलेगी पूँह खोलेगी
तबहीं तो जमाना बदलेना"

 असे भारतीय स्त्रियांना बजावणारी कमला भसीन गाण्यातून भेटली होती. भारतीय नागरिकाला,

"जिस देश में औरत अपमानित और नाशाद है।
दिलपे रखकर हात कहिये क्या देश वो आझाद है ?"

पंजाबी 'त्रिंजन' मराठी अंगणा' तही येईल! / १२१