पान:मनतरंग.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 आशियाई स्त्रियांच्या मानवी हक्कांबाबत जागरूकपणे कार्य करणारी एशियन वुमेन्स ह्युमन राईट कौन्सिल (AWHRC) ही संघटना आणि स्त्रियांच्या प्रश्नांवर आग्रही भूमिका घेऊन काम करणारी 'विमोचना' संघटना, या दोहोंनी मिळून बंगलोरला चार दिवसांची परिषद घेतली होती. परिषदेचा विषय होता, 'बोलणारी झाडे... जेव्हा स्त्रियाही बोलू लागतात.' इंडोनेशिया, फिलिपाईन्स, ट्युनिशिया, नेपाळ, चीन आदी देशांतून आणि अवघ्या भारतातून शेकडो स्त्रिया आणि संघटना आपापल्या भागातले प्रश्न आणि त्या प्रश्नांनी झुंजणाऱ्या स्त्रियांना घेऊन आल्या होत्या.
 पहिल्या सायंकाळी बांबूनी वेढलेलेल्या वनात माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी लढताना मृत्यूला सामोरे गेलेल्या स्त्रियांना श्रद्धांजली वाहिली, गोलाकार बसलेले कार्यकर्ते, मध्यात रांगोळीची सुरेख वर्तुळाकार नक्षी. प्रत्येक गट आपापले प्रश्न आणि कामाची ओळख सांगण्यासाठी त्या वर्तुळात येई. प्रत्येकाच्या हातात कागदाच्या नक्षीदार चौकोनात पेटलेला दिवा. तो दिवा त्या वर्तुळात ठेवत आणि थोडक्या शब्दांत प्रश्न मांडत. कुणी मूकनाट्याच्या साह्याने, तर कोणी संगीताच्या साह्याने किंवा नृत्याच्या तालात. झारखंडातील

मनतरंग / ११२