पान:मनतरंग.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'स्वत:च्या लेकीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला सात वर्षाची सक्तमजुरी'. दैनिकातील ही बातमी वाचून मन अक्षरश: फाटून गेलं आणि त्याच पानावर अत्यंत ठळक अक्षरात कविकुलगुरू कसुमाग्रजांच्या निधनाचे वृत्त. माझ्या मनासमोर ओळी लकाकल्या, त्यांच्या कवितेच्या-

“साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध
हक्क आहे फुलण्याचा
जन्म असो माळावरती
अथवा शाही उद्यानात
प्रत्येक कळीला हक्क आहे
फूल म्हणून जगण्याचा."

 हा जन्मसिद्ध हक्क किती कळ्यांना मिळतो? या बापाची ही चौदा वर्षांची कन्या. रात्रीची वेळ. बाप गच्च दारू पिऊन घरात आला. पाणी मागितले. थकलेल्या मायीचा डोळा लागलेला. म्हणून लेक पाणी आणायला स्वयंपाक घरात गेली. पण बापाच्या तरी डोळ्यांना लेकीच्या जागी एक बाई... उपभोग

फुलण्याचा जन्मसिद्ध अधिकार बापच नाकारतो तेव्हा... / १०३