पान:मनतरंग.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कळते की, होळी उंबरठ्यावर उभी आहे नि पाडवा पल्याड उभा राहून साखर बत्ताशाच्या माळांनी सजलेल्या रेशमी गुढ्यांची वाट पाहतोय.
 हे मोहरलेले दिवस आणि मोहराचे दिवस झोपाळ्यावाचून झुलायचे दिवस. प्रत्येक क्षण ओंजळीत भरभरून झेलायचे दिवस. हे दिवस अचानक अंगणात येतात नि त्यांचा मृदुमुलायम स्पर्श अनुभवण्याच्या आत उडूनही जातात.
 ...पण त्या मोहरलेल्या आठवणी ? त्या मात्र हृदयाच्या गाभाऱ्यात अगदी जपून ठेवायच्या. या वसंतमोहोराच्या आठवणी जे जीवाभावाने आठवीत राहातात त्यांना साठींची दृष्ट लागत नाही म्हणे !!

■ ■ ■

मनतरंग / १०२