पान:मधुमक्षिका.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८९ बापांचें काम आहे. मुले मोठी झाल्यावर आपल्या अकलेने त्यांनी कसाही बरावाईट धंदा धरिला, तरी त्यांचा दोष आईबापांकडे नाहीं. कांहीं एका प्रका- रचें काम शिकण्याविषयीं मुलाची पराकाष्ठेची इच्छा असली, आणि तें करण्याचे सामर्थ्य त्याचेठायीं येण्याजोगे आहे, असे जर असेल, तर मातापितरांनीं त्याच्या इच्छेचा भंग करूं नये. तथापि ज्यापासू आपले पुष्कळ हित होईल, तें काम जरी प्रथमतः कठिण वाटले, तरी, 'मनुष्याला काम शिकवितें ह्यावर आईबापांनी व तसे मुलांनींही लक्ष्य ठेवून प्रय न करावा, हें योग्य आहे. नीतीवर निष्ठा. श्लोक. निस्सीम सज्जन महा व्यसनीं बुडाला; सोडी न तो तरि कधीं निज निश्चयाला; अंतीं तयास परमेश सुखी करीतो; सिद्धांत हा न विसरा भ्रम जो हरीतो ॥ , जर्मन समुद्राच्या कांठीं पिकाऊ आणि सधन असा एक देश आहे. त्यांत साबिनस ह्या नामेंकरून कोणी तरुण, श्रीमान्, आणि विद्वान् पुरुष राहात असे. त्याचे स्वरूप, भाषण, राहण्याची ढब, आणि स्वभाव हीं इतकीं मनोरम होतीं कीं, ज्या मनुष्यापाशीं त्याचा परिचय व्हावा, त्यानें त्याचें अगदीं अंकित होऊन राहावें. त्यानें तेथील, ओलिंदानामक तरुण