पान:मधुमक्षिका.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८८ ) बक्षिसावरून ईर्ष्या उत्पन्न करून एकामेकांच्या चढा- ओढीनें त्यांजकडून त्यांची कर्तव्यकर्मे व चांगली कामें करून घ्यावीं. परंतु हे योग्य नाहीं. कां कीं, ही हेवा करण्याची खोडी त्यांच्या वयावरोवर वाढत जाते; आणि तिच्या योगानें मोठेपणीं संसारांत मोठमोठीं वैमनस्यें पडतात, व भांडणें होतात. बक्षिसाच्या लालुचीनें अथवा आपल्या सोबत्यांवर आपला वरचष्मा व्हावा ह्या हेतूनें मुलांस चांगली कामे करण्याची खोडी लावूं नये; तर जे चांगलें तें आपणांस केलेच पाहिजे, असे त्यांच्या मनांत भरून त्यांजकडून तें करवावें. ह्मणजे, बक्षीस मिळविण्यासाठी चांगले वागायाचें असा मुलांचा समज होऊं नये, तर चांगले वागले असतां बक्षीस मिळतें, असे त्यांचे मनांत पक्के बिंबले पाहिजे. आपल्या मुलांस पुढे कोणत्या धंद्यांत घालावयाचें, ह्याचा विचार आईबापांनीं तीं लहान असतात, तोंच करा- वा. तो त्यांजवर टाकून उपयोग नाहीं. कां की त्यांचीं मनें अगदीं अशाश्वत असतात. ह्मणजे तीं आज एक धंदा करण्याचा निश्चय करितात, आणि उद्यां भलत्याच धंद्यास लागतात. तेणें करून त्यांचे फार अहित होतें. ज्याच्या इच्छेस जो धंदा येईल तो त्यानें करावा, ही गोष्ट खरी आहे. तथापि तें केव्हां ? मुलें प्रौढ झाल्यावर; आधीं नाहीं. कां कीं, लहान- णीं त्यांस आपले बलावल, व कामाचें महत्व, पुरतें कळत नसतें. तो लहान आहेत तो त्यांस आवश्यक आणि उपयुक्त विद्येत तरवेज करावें, आणि चरितार्था- पुरते एकादें चांगले काम शिकवावें, एवढेच आई-