पान:मधुमक्षिका.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९० ) रूपवती स्त्रीची प्रीति संपादिली; आणि लागलेंच तिशीं लग्न लाविलें. त्यांची प्रीति एकमेकांवर परा- काष्ठेची जडली; आणि स्त्रीपुरुषसुखोपभोगी जोडा ह्यासारखा कोठें दुनयेंत नाहीं, असे सर्व लोक ह्मणूं लागले. परंतु मानवस्वभाव किती विलक्षण आहे ! ह्या जगांतील कितीएक मनुष्पांस सर्वदां असे वाटत असतें कीं, जें सुख आपणांस अप्राप्त आहे ते कोणा- लाही मिळू नये; आणि तें दैवयोगकरून एकाद्यास प्राप्त झाले, तर तें नाहींसें करण्याविषयीं त्यांचा एक- सारखा यत्न चालू असतो. अशा मनुष्यांच्या समा. जांत राहून स्वकष्टार्जित सुख उपभोगणे किती दुष्कर आहे बरें ! परमेश्वरा, अशा दुष्ट प्राण्यांचें वारें देखील नसावें ! ह्या प्रकारची, आरिआनानामक एक स्त्री त्या देशामध्ये होती. तिचें साविनसाशीं कांहीं थोडें नातें होतें. ती चांगली जाणती स्त्री होती; व सावि. नस ह्याला फार चाहात असे. पण त्याचें लम झाल्यापासून तिच्या मनांत असे वेड भरलें कीं, हा आतां मला कांहीं विचारीत नाहीं, हा ओलिंदेच्या अगदीं स्वाधीन झाला, ह्याला दुसरे कोणतेही माणूस दिसत नाहीं, ह्यास्तव हैं जोडपें फुटेल तर बरें, असे तिला वाटले, आणि त्यासाठी ती रात्रंदिवस जपून नानाप्रकारचे उपाय योजूं लागली. ते सगळे व्यर्थ गेले. परंतु शेवटी एक दिवस तिच्या मनोदयाप्रमाणें प्राप्त झाला. तो असा. साबिनस ह्याला कर्ज झालें होतें. त्याची फिर्याद करून सावकारानें त्याजवर