पान:मधुमक्षिका.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८७ ) कुळाची ख्याति वृद्धिंगत करणारींही आहेत, असें त्याला वाटतें. असें नाहीं. आईबापांची ममता सर्व मुलांवर सारखी असते पंतांनीं एके ठिकाणीं झटले आहे. " सुविद्य धन मेळवी वचन आपके आंवरी प्रपंच भर घे शिरों करि कृपा पिता त्यावरी असा जरि नसे रुचे तरि न तो अभद्र क्षण." हें खरें व सर्वानुभवसिद्ध आहे. तसेंच सालोमन नामा एक साधु ह्मणतो, "शाहाण्या पुत्राच्या योगानें पिता हर्ष पावतो; परंतु, कुपुत्र हा, आपले आईलाही जड होतो." भावंडे पुष्कळ असलीं ह्मणजे, त्यांपैकीं बडील असतात त्यांचें घरामध्ये चांगले चालतें व त्यांचा बराच मान असतो; अगदीं धाकटीं असतात तीं फार लाडकावलेली आणि बिघडलेली असतात; आणि मधल्यांची कांहींच फारशी दाद नसते. तथापि बहुतकरून त्यांतलाच एकादा मोठा कावेबाज आणि पटाईत निपजतो. मुलांच्या खाण्यापिण्याच्या, वस्त्र- प्रावरणाच्या, अथवा दुसऱ्या कोणत्याही हौसेच्या कामांत पैसा खर्चण्याविषयीं कंजूसपणा केला असतां तीं विघ- डतात, लबाड होतात, कपट शिकतात, दुष्टांची संगत घरितात, आणि पैसा हाती लागला ह्मणजे ह्याचें काय करूं आणि काय न करूं असे त्यांस होऊन ती भिकेस लागतात. ह्यासाठी आईबापांनी त्यांस चांगले धाकांत ठेवावें, परंतु त्यांच्या सुखाचे कामीं पैसा खर्चण्यास जिवाची काढाओढ करूं नये. मातापितरें व शिक्षक यांस संवय पडून गेलेली असते कीं, मुलांमध्ये कांहीं P