पान:मधुमक्षिका.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

4 ( ८५ ) मुलगी त्यांचे बरोबर दिली. ती मुस्वरूप होती. अं मळसे दूर गेल्यानंतर, त्यांत अफगाण होता, तो आप ल्या सोबत्यास ह्मणतो, "कसेरे गड्यांनो, ही तर खूप छान आहे! मला परवानगी देतां?" सिंधी बोलला, "हूं, ठीक आहे, मी तिचा तेवढा घोडा उपटतों ह्मणजे पुरे." हे भाषण ऐकून हिंदूस वाईट वाटले. आपल्या सोबत्यांस नानाप्रकारें बोध केला. सर्व व्यर्थ. त्यांनी करावयाचें तें केलें. त्यानें परंतु तिचें पातिव्र- त्य भंगले, व घोडेही गेले. ती रडतरडत बापाकडे गेली आणि कच्ची हकीकत सांगती झाली. तेणेंकरून त्याला इतका संताप आला की, त्याच्या नेत्रांतून टप- टपां रक्ताचे थेंब पडले. त्यानें लागलेच आपले नौ- कर पाठवून त्या तिघांसही पकडून आणिलें. अफगाण आणि सिंधी ह्या दोघांच्या आंगांची कातडी सोलून काढिलौं, आणि त्यांस मारिलें. व त्या हिंदूशीं तिचें लग्न लाविलें, व त्याच्या नांवाने एक गांव वसविलें. तेव्हांपासून आरबलोक हिंदूस इमानी मानून चाहतात. मातापितरें आणि मुलें. मुलांपासून जे समाधान होते, ते केवळ मातापित- रांच्या अंतःकरणांसच समजतें. तशींच मुलांविषयीं. चीं भयें आणि दु:खेंही त्यांच्यांच मनांस पुशिलीं पा हिजेत. मुलांच्या योगानें उद्योग व श्रम करण्याची उमेद अधिकाधिक येते; व कितीही कष्ट झाले, तरी त्यांचा शीण वाटत नाही. परंतु, विपत्ति अस ली ह्मणजे त्यांचे हाल पाहून अतिशयित दुःख होतें.