पान:मधुमक्षिका.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८४ ) लीं.- पेशावरामध्ये एक मौलवी असे. तो एका शिं प्याचे बायकोशीं लागू होता. तो तिशीं स्वस्थपणे गप्पा मारीत असतां शिंपी अकस्मात् घरांत आला. त्यास तो प्रकार समजतांच, त्याला असा त्वेष आला की, त्यानें त्या उभयतांचेही तुकडेतुकडे करून ते, सुलतानमहंमद बर्न साहेबापाशी गोष्टी सांगत बसला होता, तेथें नेले. राजानें सर्व हकीकत ऐकून घेऊन शिंप्याची वाहवा केली ......... ( २३ मार्च.) आज पाऊस आणि गारा ह्यांची पराकष्ठेची वृष्टि झाली. तेव्हां, मजपाशीं एक बाळगलेले माकड होतें त्यानें गारा अतिशयित गार असतांही पटापट टिपून खाण्याचा सपाटा चालविला. तें पाहून बर्न साहे- बास मोठे आश्चर्य झालें. ( १ एप्रिल . ) – बर्न साहे- व व सुलतानमहंमद हे बरोबर शिकारीस गेले. मागें. मला एक जवाहिया भेटला. तो एशिया खंडांत पुष्कळ देश फिरला होता. त्यानें मला तुर्कस्था- नांतल्या पुष्कळ चमत्कारिक गोष्टी सांगितल्या. त्यांत तो असें ह्मणाला कीं, तुर्कस्थानांत अफगाण लोकांपेक्षां हिंदूंस लोक चांगले चाहतात. ह्याचें कारण मी त्यास पुसिलें. तेव्हां त्याने मला एक गो- ष्ट सांगितली. ती अशी. एक अफगाण, एक सिंधी, तेथे आणि एक हिंदू, असे तीन असामी मक्केस जात होते. ते आरबस्थानाच्या सीमेवर येऊन मार्ग चुकले. एक शेतकरी काम करीत होता, तो त्यांस भेटला. त्याला त्यांनी आपली वाट चुकल्पाची सर्व हकीकत सांगितल्यावर त्यांने त्यांस मार्ग दाखविण्यास आपली