पान:मधुमक्षिका.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८३ ) "अनेक आहेत. परंतु, दिल्लीच्या इतक्या चांगल्या नाहींत. शहराच्या उत्तर भागीं एक मोडका बाले- किल्ला आहे. त्यावर उभे राहिले असतां फार लांब पर्यंत सुंदर प्रदेश दृष्टीस पडतो. रहिवासी लोक बहुधा अफगाण ह्मणजे दुराणी आहेत. लोकसंख्या सुमारें ८०००० आहे. बडे लोक खेरीज करून बाकीचे लोक निर्दय व कूर आहेत. - पेशावरची हवा वारंवार बदलणारी आहे. तरी तिजपासून तेथच्या उत्पन्नास धक्का पोहचत नाहीं. दुष्काळ सहसा कधीं पडत नाहीं. कृषिकर्माकडे लोकांचे लक्ष्य इतकें आहे कीं, पंजाब हा उत्कृष्ट पिकाऊ देश आहे तरी त्यासही पेशावराने मागे टाकिलें आहे, असे ह्मणण्यास चिंता नाहीं. द्राक्षे, सीताफळे, अंजीर, लिये, नारिगें, इत्यादि फळें तेथें पुष्कळ चांगली होतात. ह्या देशावर दार करितात. 2 अंमल वेगवेगळे जागों वेगवेगळे सर- त्यांस न्याय हा कसा तो मुळींच ठाऊक नाहीं. ऐषआरामांत त्यांचे सर्व दिवस जा तात. त्यांजपाशीं सैन्य वरेंच असतें. त्यांतील लोक मोठ्या आवेशानें लढतात. - पेशावरावर ज्या राजाचा हल्लीं अंमल आहे, त्याचें नांव सुलतान महंमदखान. तो बांध्यानें मध्यमसर असून उतारवयांत आला आहे. तो मोठा विषयी पुरुष आहे. त्याचे सभोवती बहुतेक तरुण व सुस्वरूप बायकांचा वेढा असतो. व्यवस्थेची काळजी तो बिलकूल करीत नाहीं. नेह मी नाना तऱ्हेचे पोषाक करून नटण्यांत मग्न असतो. त्याला सध्या तीस मुले आहेत, पूर्वी तीस मरण पाव राज्य.