पान:मधुमक्षिका.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८२ )


जाण्याचा रस्ता केवळ एका माणसाचा आहे. आंत पुष्कळ बायका व पुरुष काम करीत होते.मीठ तांबूस व फार कठीण असतें. ते हातोड्यांनीं व पा- हारांनीं खणतात. खाणीत ओलावा मुळींच नाहीं. आंतली माणसें अगदीं पिवळीं पडून गेलीं होतीं, व तीं रोगी दिसत होतीं. सर्व खाणींचें दरसालचें उत्पन्न अठरा लक्ष रुपये आहे. शिवाय दोन लाख रुपये मिठावरच्या कराचे उत्पन्न होतात. मीठ खेचरांवरूनव उंटांवरून पंजाबांत जातें.......( २५ फे. )
 दारापूर. - येथें बायकांचे प्राबल्य आहे. त्या नवऱ्यांचें मुळींच ऐकत नाहींत, व त्यांस मानीत नाहींत.त्यांस त्या आपल्या आज्ञेत वागवितात.त्याअर्थी, त्या गांवास दारापूर हे नांव योग्य. !!......( २८ फे० )
 रावळपिंडी.- येथे आह्मी आलो. पुढें आह्मांस अफगाणिस्थानांत प्रवेश करावयाचा होता, ह्मणून आह्मीं आपली नांवें बदललीं, तीं अशीं. बर्न साहेब आपणांस शिकंदरखान ह्मणवूं लागले; आणि मी हस- नजान हें नांव घेतलें. येथील हवा चांगली आहे; व शेतें चांगली येतात......... ( ८ मार्च. )
 पेशावर-हें शहर साफ मैदानावर वसलेले नाहीं..समुद्राच्या सपाटीपासून ह्याची उंची सुमारें १७००फूट आहे.ह्याच्या सभोवतीं कोट नाहीं. परंतु एक बाजू खेरीज करून बाकी सर्व दिशांकडे डोंगर आहेत. घरें कच्च्या विटांचीं बांधिलेली आहेत. रस्ते लाहो- रच्यां पेक्षां मोठे व निर्मळ असून त्यांवर फरसबंदी केली आहे. शहरांत ओढे पुष्कळ वाहतात. मसीदी