पान:मधुमक्षिका.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८१ )


लाहोरच्या एका वृद्ध पुरुषानें त्याची दंतकथा सांगि- तली. ती अशी. माधू हा हिंदू मुलगा होता. तो फार सुंदर असल्या कारणानें लालहुसेन नामक एका अवलियाच्या मनांत भरला. त्याला आपला चेला करण्याकरितां त्यानें त्यास त्याचे बापापाशीं मागितलें. तो देईना. पुढे थोड्या दिवसांनीं माधू एकाएक मरण पावला. तेव्हां त्याचीं आईबापें दीन होऊन तें प्रेत घेऊन लालहुसेनापाशीं आलीं. तेव्हां जीवंत करीन पण हा माझा चेला झाला पाहिजे, अशी त्यांपा- सून त्यानें आणभाक घेऊन माधूस उठविलें. नंतर तो त्याचा चेला झाला. ( ६ फे. १८३२ ). पंजाबी लोक फार अमंगळ राहतात. ते कधीं स्नान करीत नाहींत, व तोंडही धूत नाहींत. तेणें करून ते हर- हमेषा ज्वराने आजारी पडतात.
 बिकि.― येथें बायका फार देखण्या आहेत. एका महंतिणीनें बांधिलेली गोडे पाण्याची विहीर मोजण्या- करितां मी गेलों होतों; तेथें अनेक स्त्रिया पाणी, शें- दीत होत्या. त्यांचीं शरीरें ज्वान पुरुषांच्या प्रमाणें पुष्ट आणि वळणदार होतीं.एक स्त्री तर केवळ देवांगनाच मला भासली. तिच्या शरीराचा बांधा, तोंडाचा डौल, आंगाचें तेज, उभे राहण्याचा झोंक, आणि मंजुल शब्द, हीं खरोखर परम चित्तवेधक होतीं. • • • ता० २३ फे०१८३२.
 दादलखानांची पिंड.- हें शहर सुंदर आहे. मिठाच्या खाणीवरून हें प्रसिद्ध आहे. सुमारे ४०० यादची एक खाण आह्मीं जाऊन पाहिली. तींत