पान:मधुमक्षिका.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ८० )



नाहींत. हवा स्वच्छ आहे. उन्हाळ्यांत उष्णता व हिवाळ्यांत थंडी, हीं दोन्हीं अतिशयित होतात. जमीन पिंकाऊ आहे. गहूं वगैरे धान्यें विपुल पिकतात. कधीं कधीं धरणीकंप होतात. गेल्या रात्रीं एक लहानसा धक्का बसला... .. (२३ जाने. )
 - लाहोरांतले लोक शीखधर्मी ह्मणजे नानकपंथी आहेत. ते बावानानक ह्यास गुरु ह्मणून भजतात. त्यांच्यांत डुकरें खाण्याचा पाठ आहे. मुसलमान लोकांस ते पाण्यांत पाहतात. - लाहोरचा सर्व कार- भार एकटा रणजितशिंग चालवितो. त्यानें एक असा कायदा केला आहे कीं, जो कोणी खून करील, दोन त्याचे कान व नाक कापून टाकून, किंवा तीन हजार रुपये दंड घ्यावा.त्यापासून राजा गुलाब-शिंग, राजा दिनाशिंग, आणि राजा सचेतशिंग, ह्या तिघांनीच मनुष्यांवर महाराजांची मेहेरवानी आहे.कामाकाजांत ते त्यांची मसलत घेत असतात.
 - शाद्रा येथें जाऊन दिल्लीचा बादशाह जाहांगीर ह्याची आह्मीं कबर पाहिली. ती रावी नदीच्या उज- व्या तीरावर आहे. ती उत्तम प्रतीच्या दगडांनीं बांधिलेली असून, तिजवर नक्षीही फार चांगली काढि लेली आहे. नूरजहान हिची, ह्मणजे शाहाजाहा नाच्या राणीचीही कबर तेथेंच होती. पण ती मोडून गेली. - सुमारे दीड कोसावर माधुलाल हुसेन ह्याच्या कबरीजवळ वसंताची जत्रा भरली होती, ती पाहाव- यास अमी गेलों. तेथें माधुलालहुसेन हा कोण होता, अशी अह्मी चौकशी करूं लागलों. तेव्हां