पान:मधुमक्षिका.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७९ )



त्यानें सोन्याच्या खुर्च्यावर बसविलें ; आणि चार घाट • का त्यांशी चांगले भाषण केलें. त्यावरून असें दिसून आलें कीं, तो इंग्लिश सरकारचा दोस्त आहे. रणजितशिंग हा आंगाने डोळ्याने त्यास दिसत नाहीं. सडपातळ असून / एक वयपरत्वें पिकलेली त्याची लांब डाढी त्याच्या बेंबीवर पडते. तो आपलें राज्य एकटा चालवितो. त्याचा एक डोळा घड आहे; तो नेहमीं अमलानें लाल झालेला असतो. नाचाचा षोक त्याला अतिशयित नर्तन कर णाऱ्या तरुण रूपवती स्त्रिया त्या हरघडी झुलत असतात. - त्याच्या एका प्रधानाने त्याची एक अशी चमत्कारिक गोष्ट सांगितली कीं, हिराशिंग नामक तेरा वर्षांच्या एका खूपसुरत मुलावर रणजिंतशिंग पराका- ष्ठेची प्रीति करितो. आणखी असें ह्मणतात कीं, ह्याच गुणावरून महाराजानें हिराशिंगाचा बाप दिना- शिंग ह्यास त्याच्या तारुण्याचे भराचे वेळी मोठी जाहा- गीर दिली. महाराज शेजेवर गेले ह्मणजे तिकडे इतर कोणास जाण्यास परवानगी नसते; परंतु, हिरा- शिंगास मात्र कोणी आडकाठी करूं नये, असा हुकूम आहे. हिराशिंग अलौकिक सुस्वरूप आहे असें नाहीं. तरी, रणजितशिंग दरबारामध्ये त्याला आपले बरोबर सोन्याच्या खुर्चीवर बसवितो; आणि दिनाशिंग तेथे जमिनीवर बसतो.- लाहोरास मोठा किल्ला आहे, व त्या भोवती खंदक आहे. शहरांतील रस्ते ओंगळ आणि इतके अरुंद आहेत कीं, दोन घोडींही जाण्यास पंचाईत पडते, पेंठा चांगल्या ओळींनीं वसलेल्या