पान:मधुमक्षिका.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७८ )



मोहनलालाचे प्रवासवर्णन.
दिल्लीपासून पेशावरापर्यंत.
विशेष गोष्टी.

 पाणिपत. - येथे बुवाली कलंदर नामक प्रख्यात तिच्या जवळ काळ्या प्राचीन साधूची कबर आहे. दगडाचे दोन मोठे स्तंभ आहेत. ते सुमारें १३ फूट उंच असून त्यांस लोक सागमूसा असें ह्मणतात. • ता० २३ दिसें ० १८३१.
 सुगा.-येथून रात्रीं ५०० स्वार व २ तोफा लाहो- राकडून येऊन निहांग लोकांच्या पारिपत्याकरितां चालत्या झाल्या.
 शीखजाट लोकांत अशी वहिवाट आहे कीं, एकादे बायकोचा नवरा जर मरण पावला, तर ती त्याच्या भावास वारत्ये. नवरा कोठें प्रवासास गेला, तर त्याची बायको त्याचे भावाशीं नवऱ्याप्रमाणें खुशाल वहिवाट करिते, तरी नवयाला राग मुळींच येत नाहीं. आणखी असें ऐकिलें कीं, हिमालय पर्वतावर एकाशींच लग्न लाग- लेली अशी स्त्री, एक देखील नाहीं. तर प्रत्येकीला एका घरांतले तीन तीन चार चार देखील नवरे असतात. • • • • • • • • ता० १३ जाने ० १८३२.
 लाहोर - महाराज रणजित शिंग ह्याचा निरोप आल्यावरून आह्मी त्यास भेटण्याकरितां बागामध्ये त्याच्या तंबूंत गेलों. तो केवळ इंद्रभुवनासारखा आह्मांस वाटला. रणजित शिंगाने पुढे येऊन आमचा आदरसत्कार केला. बर्न आणि जिरार्द ह्या साहेबांस