पान:मधुमक्षिका.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७७ )



 ग्रेतबितन आणि ऐर्लंद ह्यांचें सरासरी उत्पन्न दरसाल ५००० ० ० ००० रुपये आहे. ही रकम, युरोपांतील इतर सर्व राज्यांच्या दरसालच्या उत्पन्नां च्या बेरजेच्या सुमारें तृतीयांशाइतकी आहे.  इंग्रज सरकारास कर्ज सुमारें ८,००,००,००, ००० रुपये आहे. ही रकम, युरोपांतील इतर सर्व राजांस जे. कर्ज आहे, त्याच्या एकंदर बेरजेच्या निमेहून जास्त आहे. केवळ प्रेतबितन आणि ऐर्लंद ह्यांत सरकारची मालमत्ता सुमारें ३७०००,००० रुपयांची आहे; हींत जर बाहेरच्या ताब्यांतील देशां- तली मालमत्ता मिळविली, तर एकंदर बेरीज ५५००००००००० रुपये होते. प्रजेची दरसाल- ची प्राप्ती, ह्मणजे, त्यांच्या कलाकौशल्याचे व उद्यो- गाचें उत्पन्न अजमासें ५००००००००० रु० आहे.
 ब्रितिश बेटांची लोकसंख्या, इ० स० १८२१ त २१२८२९२६ होती; आणि इ० स० १८५१ त २७६१४८६६ होती; ह्या मानानें तो वाढत चालली आहे. तसेच इंग्रजांच्या बाहेरच्या देशांतल्या त्यां- घ्या राज्यांतील लोकसंख्या सुमारे १८००००००० आहे.