पान:मधुमक्षिका.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७६ )



 दक्षिण अमेरिकेत ;- देमिरारा; एसेक्किबो; बरविस; हीं गिनियापैकी आहेत; आणि शिवाय फाकलंद बेट; हीं इंग्रजांकडे आहेत.
 वेस्तइंदीज बेटांत.—बहामा जमेका; बार्बादोस; त्रिनिदाद इत्यादि बेठें इंग्रजांकडे आहेत.
 ग्रेतबितन आणि ऐलंद ह्यांचें एकंदर क्षेत्रफळ सुमारें १२०००० चौरस मैल आहे; आणि लोक- संख्या सुमारे २८०००००० आहे.
 सामान्य गणनेवरून असें समजलें आहे कीं, हे इंग्रज खुद आपल्या प्रेतनितनाच्या साठपटी इतक्या प्रदेशावर राज्य करीत आहेत; व त्यांच्या ताब्यांत येतातनच्या प्रजेच्या साहापटीपेक्षांही अधिक, इतकी प्रजा आहे. तेव्हां 'इंग्रजांच्या राज्या-वर सूर्य कधींही मावळत नाही,' असें जें ह्मणतात, तें खरे आहे. कांकीं वर सांगितलेले अनेक देश एका- च गोलार्धांत आहेत असें नाहीं; दोहोंतही आहेत. यास्तव, एका गोलार्धांतील देशांवर सूर्य मावळला, तर तो दुसऱ्या गोलार्धांतील देशांवर प्रकाशित अस- लाच पाहिजे.
 हिंदुस्थानांतील एतद्देशीय स्वार खेरीज करून, इंग्रजांचें सैन्य सुमारें १००००० आहे; लढाऊ गलबतें ५०० पेक्षां अधिक आहेत; त्यांपैकी शंभरा- पेक्षां अधिक गलबतांवर, प्रत्येकांत, ७२ पासून १२० पर्यंत तोफा असतात. इंग्रजांचीं व्यापारांची जाहाजें सुमारें ३०००० आहेत; आणि त्यांवर खलाशांची संख्या, एकंदर सरासरी, १८०००० हून अधिक आहे.