पान:मधुमक्षिका.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७५ )



हीं बैठें युरोपाच्या वायव्येस आतलांतिक महासागरांत भाहेत. हीं व ह्यांच्या जवळचीं दुसरीं लहानलहान बेठें, ह्यांस ब्रितिशवेढे असे एक वेगळेच नांव आहे. यांखेरीज इंग्रजांकडे मुलूख आहेत ते येणेप्रमाणें.-
 एशिआखंडांत. - हिंदुस्थानाचा बहुतेक भाग; आरा- कान, हा हिंदुस्थानाच्या पूर्वेकडे आहे, तो इ० स०१८२६ त ब्रह्मी लोकांकडून मिळाला; सिंहलद्वीप ह्मणजे लंका; ह्याच्या पूर्वेकडचें मलाका; त्याच्या पश्चिमेकडचे प्रिन्स अफ वेल्स बेट; सिंकापूर; आणि चिनी लोकांकडून मिळालेलीं हांगकांग बेटें; इतका प्रदेश इंग्रजांकडे आहे.
युरोप खंडांत. - जर्मन समुद्रांतील हेलिगोलांद बेटें; जिब्रालतरचा किल्ला स्पेनांत आहे तो; भूमध्यसमुद्रां- बील मालता बेट; आणि ग्रीसच्या पश्चिमे कडील अयोनियन बेटें; ही इंग्रजांकडे आहेत.  आस्त्रेलियांत. - न्यूहालंदाचा बहुतेक भाग; व्हांदि- मन्सलांद; न्यूझीलंद; आणि नाफक बेटें; हीं इंग्रजां- कडे आहेत.
 आफ्रिका खंडांत. - केप अफ गुद होप; सीरा लोन; करनांदोपो; सेंत हेलिना; असेंशन; मारिशस; आणि ऐल भफ फ्रान्स; ही इंग्रजांकडे आहेत.
 उत्तर अमेरिकेंत. -लाब्रादोर; हदसनच्या सामुद्रधुनी - च्या भोवतालचा प्रदेश; वरचा कानडा; खालचा कानडा, न्यूत्रनजिक; नोवास्कोशिया, न्यूफाउंद- लांद; प्रिन्सएदवर्दस बेट; केप त्रितन; बरमुदाज़ आणि सोमर बेठें; आणि हांदुरास अखातातील बेलि- ज बगैरे बसाहाती; ह्रीं इंग्रजांकडे आहेत.