पान:मधुमक्षिका.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



वर आपल्या आश्रयदातीचें तें छिन्नभिन्न प्रेत जेव्हां मठवाशांनीं पाहिलें, तेव्हां त्यांस किती वाईट वाटले, तें लिहिण्याचें कारण नाहीं. कां कीं, त्याची कल्पना बाचणारांचे मनांत सहज येण्यासारिखी आहे. त्यांत सिरिलो हा जितका दुःखित झाला, तितका दुसरा कोणी झाला नाहीं. त्यावरून, ते कर्म त्याचे हातून . झालें असेल, असें कोणाच्याही मनांत आलें नाहीं. परंतु पुढे थोडक्याच दिवसांनी तिचे दागिने त्यालाच त्याचे घरांत सांपडले; तेव्हां त्याला असें झालें कीं, ह्या वेळीं पृथ्वी पोटांत घेईल तर फार चांगलें.पण करतो काय? त्यानें ते दागिनें, लज्जेनें मान खालीं घालून, डोळ्यांचे पाणी पुशीत पुशीत, मठवाशांच्या मंडळींत नेऊन दिले; आणि तो मठ सोडून दुसरे मठांत जाऊन राहिला. पहा ईश्वराची लीला काय अगाध आहे ती.


इंग्रजांचे राज्य.

 ज्या महापराक्रमी लोकांच्या राज्यांत आपण आहों, त्यांच्या राज्याचा विस्तार पृथ्वीवर केवढा आहे, हें समजणें फार उपयोगी व मनोरंजक आहे. ह्मणून त्याजविषयीं माहिती संक्षेपानें लिहितों.
 ह्यांचा मूळ देश व राज्य झटलें ह्मणजे, प्रेतत्रित- न व ऐर्लंद, हीं दोन बेठें होत. ग्रेतबितनाचे, इंग्लंद, स्कातूलंद, आणि वेल्स, असे तीन विभाग केले आहेत. ऐलंद हैं प्रेतवितनाच्या पश्चिमेस आहे; ह्मणून त्याला कोणी पश्चिम बितन असेही ह्मणतात.