पान:मधुमक्षिका.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



आपल्या गादीखाली लपवून ठेवून, वर स्वस्थ निजली. हें ज्यांनी पाहिलें होतें, ते, हा सकाळच्या प्रहरी काय करतो, हें पाहण्यास फार उत्सुक झाले होते.
 तो सकाळीं जागा होऊन पाहातो तो, त्याचे आंथरुणाला मध्येच एक गोळा आलेला त्याचे दृष्टीस .: पडला. तेणेंकरून त्याला मोठे आश्चर्य वाटले; आणि ते झगे आहेत, असें पाहून तर त्याची बुद्धिच गुंग होऊन गेली. तो बाहेर जाऊन लोकांस विचारूं लागला कीं, हें झालें तरी कसें? तेव्हां मठवाशांनी त्याला कच्ची हकीकत कळविली. ती ऐकून, तो लाजून मान खालीं घालून एक अक्षरही न बोलतां : चालता झाला; आणि ते झगे त्यानें तात्काळ जिकडचे तिकडे पोहोंचविले.
 सिरिलोची आणखी एक गोष्ट सांगतों ह्मणजे झाले. एका श्रीमान् धार्मिक स्त्रीने त्या मठास बहुत दिवस पर्यंत चांगला आश्रय दिला होता. ती एकाएकीं मरण पावली. तिला, मठाजवळच एक जागा तयार केलेली होती, तींत, तिच्या सांगण्याप्रमाणे तिच्या अलंकारभूषणांसह पुरलें. तेव्हां मठवाशांस फार दुःख झालें; त्यांत सिरिलो तर पराकाष्ठेचा दुःखित झाला. नंतर रात्र होऊन सर्व निजल्यावर, हे विल- क्षण पुरुष, निद्राभ्रमांत हळूच उठून तिच्या समाधी- पाशीं गेले; त्यांनी तिचें प्रेत उकरिलें; बोटें तोडून आंगठ्या, व इतर अवयव छिन्नविच्छिन्न करून बाकीचे अळंकार काढून घेतले, ते आणून आपल्या खोलीत ठेविले, आणि मग शयन केलें. उजाडल्पा-