पान:मधुमक्षिका.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७२ )



नंतर हाताची बोटें बाहेर झाडल्यासारिखीं करून, जं ऐकिलें त्यांत कांहीं हांशील नाहीं, असें त्यानें दाखविलें. मग दुसऱ्या कोणा माणसाकडे वळल्यासारिखें करून तपकिरीकरितां चिमूट पुढे केली. पण तेथें शेजारीं कोणी नव्हतें; तेव्हां तो अमळसा हिरमुसल्या सारखा होऊन मांगें वळला. नंतर त्यानें आपली डबी काढिली, तींत कांहीं नव्हतें; तरी तींत बोटे घालघालून चिमटी काढण्यास त्यानें पुष्कळ यत्न केला, तो सर्व व्यर्थ गेला; तेव्हां संशयमुद्रेनें चोहींकडे पाहून, ती डबी चटकर आपले खिशांत टाकिली. पुढे कांहीं वेळ स्तब्ध बसून कांहीं उघड कारण नसतां एकाएकीं तो परा- काष्ठेचा संतापला, आणि शिव्या शाप देऊं लागला, व तडातड शपथा वाहू लागला. इतकी कृति दुरून पाहून इतर मठवासी कंटाळून उठून गेले.
 तो पुनः एके रात्रीं निद्राभ्रमांतच उठून, मोठ्या लगबगीनें, त्या मठांतील पवित्र यज्ञशाळेत गेला. तो, तेथें एक ताट ठेवीत असत, तें चोरून आणण्या- च्या बेतानें गेला असावा असें वाटतें. परंतु आदले दिवशीं तें घांसण्याकरितां बाहेर टाकिलें होतें, ह्मणून तेथे त्याला कांहीं सांपडलें नाहीं. तेणेंकरून त्याला फार संताप आला; आणि, रिक्तहस्तें आपल्या खोलींत परत जावयाचेंच नाहीं; असा पक्का निश्चय करून, तेथें जवळच कांहीं मठवाशांचे यज्ञकर्मे करतेवेळीं घालण्याचे उंची उंची रेशमी झगे होते, त्यांतले दोन तीन हळूच उचलून घेऊन, स्वारी भयभीत होत्साती, पळत पळत आपल्या खोलींत आली, आणि ते कपडे