पान:मधुमक्षिका.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७१ )



त्यानें सिरिलो ल्यास, पुनः एके दिवशीं, पहिलीपेक्षांही- मोठी गोष्ट घराहून उतरून आणायास सांगितलें; आणि त्या रात्रींत तो काय करतो, तें पहाण्यासाठी, आपण त्याच्या शेजारच्या खोलींत जाऊन जागत वसला. हे राजश्री पूर्वी प्रमाणेच लिहितां लिहितां कंटाळून आप- ल्या आंथरुणावर जाऊन निजले. आणि झोपेतच पुनः एक तासानें आंथरुणावरून उठून, धडा पुरता करून परत जाऊन निजले.
 नंतर ही त्याची खोड लोकांत प्रसिद्ध झाली. तेव्हां तिची त्याला फार लाज वाटू लागली. तो प्रौढ झाला, तेव्हां त्याचे मनांत असा विचार आला कीं, आपल्या मनाची स्थिति अशी वाईट आहे, त्यापेक्षां सर्वसंग- परित्याग करून एकाद्या मठांत जाऊन राहावें, हें फार चांगलें. त्या प्रमाणें तो अवधूत होऊन, एके मठांत जाऊन राहिला. तेथें त्याच्या धार्मिकपणाची प्रथमतः फार कीर्ति झाली; पण ती त्याला फार दिवस लाभली नाहीं. कां कीं, तो जितकीं सत्कृत्ये दिवसास करी, ति- तक्यांचा वचबा, तो रात्रीं जिकडेतिकडे हिंडून वाईट कर्मांत काढी, तेणें करून सर्वांचें त्यावरचें मन उडालें. त्या मठांत तो प्रथमतः नुसता ह्या खोलींतून त्या खो- लींत आणि त्या खोलींतून ह्या खोलींत, ह्याप्रमाणें रात्रीं झोपेत धांवून वेड्यासारखा बडबड करूं लागला. तरी त्याचा इतर मठवाशांनीं त्रास केला नाहीं.
 एके रात्री एक तास पावेतों तो आपले विच्छान्यावर स्वस्थ निजून, झोंपेंत एकाएकीं उभा राहिला, आणि कांहीं बोलणें ऐकिलेसे करून मोठ्यांनीं गदगदां हंसला.