पान:मधुमक्षिका.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७० )



त्याने सेनापतीचीं वस्त्रे दिली. कळावें लोभ असावा ही विनंती.

निद्राभ्रम.


इताली देशांत पाद्युआनामक एक गांव आहे. तेथें ^ सिरिलो पादोव्हानो ह्मणून कोणीएक मनुष्य रहात होता. तो जागृतावस्थेमध्यें साधा, इमानी, धर्म- निष्ठ, आणि स्पष्टवक्ता भसां असे; परंतु झोंपेंत इकडे तिकडे हिंडून चौर्यादिक पापकर्मे करी. त्याच्या पुष्कळ गोष्टी पुस्तकांतून लिहिल्या आहेत. त्यांपैकीं मोठमो या कांहीं येथें सांगतों.
 तो लहानपणीं शाळेत जात असे. एके दिवशीं त्याच्या गुरूने त्याला एक लांबचलांब गोष्ट घराहून उतरून आणावयास सांगितलें. तो फारच मोठी होती ह्मणून, रात्रीं लिहितां लिहितां अगदीं थकून जाऊन आतां आपणाच्याने लिहित नाहीं, आणि उद्यां शिक्षा झाल्यावांचून राहात नाहीं, असा विचार मनांत आणून तो फार खिन्न झाला, आणि गोष्ट तितकीच अर्धवट टाकून तो आपले विच्छान्यावर जाऊन निजला. आणि सकाळी उठून पाहूं लागला तों, जो धडा रात्रीं तो अर्धाच टाकून निजला, तो त्याच्याच हातचा पूर्ण लिहिलेला त्याला त्याच्या मेजावर सांपडला. तेव्हां हे झाले कसें, ह्याचा त्याला मोठा अचंबा वाटला. आणि तो हकीकत त्याच दिवशी त्यानें आपले त्यालाही मोठे नवल झालं. काय,गुरूला कळविली. तिचें परंतु, ह्या गोष्टीचें मर्म ह्याचा पक्का शोध लावावा, असें मनांत आणून