पान:मधुमक्षिका.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६ ९ )



पंचाइतीत पडता. परंतु, चार्लसाला त्याचें कांहींएक वाटले नाही.कदाचित् दुसरा ह्यासारखा घोडा मि- ळेल, परंतु, असें छानदार खोगीर व पिस्तुल पुनः लाभणे कठीण, अशी गोष्ट मनांत आणून, त्यानें त्याचं सगळे एक गांठोडें बांधिलें; आणि तें पाठीवर घेऊन वाट धरली. सुदैवेंकरून एक धर्मशाळा जवळच लागली, तींत तो गेला. आणि तबेल्यांत जाऊन पाहतो तों, एक उत्कृष्ट घोडा त्याच्या मनासारखा त्याच्या नजरेस पडला. त्याची कांहीं विचारपूस न करितां त्यानें खुशाल त्याजवर खोगीर ठेविलें, लगाम घातला, आणि रिकावींत पाय घालून आतां तोवर बसणार, इतक्यांत घोडा चोरीस जात आहे अशी बातमी मूळ मालकास कळून तो तेथें आला. तो राजास न ओळखून ह्मणतो, “अरे, ए, घोडा को- णाचा कोठे चालविला रे ?” राजपुत्र उत्तर देतो, "हो, हा घोडा मी नेतों; कांकीं, सध्या मजपाशीं दुस- रा घोडा मुळींच नाहीं. हा जर मी न नेईन तर, ́हें खोगराचें वगैरे ओझें मला स्वतः डोक्यावर वाहून न्यावे लागेल". हें ऐकतांच घोड्याच्या मालकास राग येऊन त्याने आपली तरवार उपसली. राजपु- त्रही आतां तसेंच शस्त्र काढणार, इतक्यांत तेथे रा- जाच्या गारदीचे लोक आले; त्यांनी हा राजपुत्र आहे असें त्या मनुष्यास सांगितले, तेव्हां त्याला सलज्जाश्च- र्य वाटलें. तथापि राजपुत्र त्याचा हात धरून त्याला असें ह्मणाला कीं, शाबास, तूं शूर आहेस, तुला मी चढवीन. पुढे कितीएक दिवसांनीं खरोखरच त्या