पान:मधुमक्षिका.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६८ )



मान होता. ज्या राजांस सुशिक्षक मिळाले, होत. गुरु तरी विद्वान असून सद्गुणी पाहिजे. त्यानें दुःखें पाहिलेलीं असावीं; ह्मणजे, सुख ह्मणजे काय, दुःख ह्मणजे काय, सत्कीर्तीची खरी योग्यता काय, राजत्वापेक्षां सज्जनत्व श्रेष्ठ आहे, स्वकर्तव्य कर्म कर णारा शेतकरी जुलमी राजापेक्षां श्रेष्ठ आहे, इत्यादि गोष्टी तो आपल्या राजशिष्याच्या अंतःकरणांत बिंबवितो; परं तु असें घडतें कोठें ? राजेलोकांस गुरु प्रायः त्यांचे सा रखेच अल्पज्ञ, डौली, मूर्ख, व दुराग्रही मिळतात. त्यां सं मानवस्वभावाचें ज्ञान ह्मणजे विद्येचें मूळतत्व, तें मुळींच ठाऊक नसतें. जे निर्धन ते मूर्ख, व जे श्री- मान् ते शाहणे, असें त्यांस वाटत असतें.हलक्या प्रतीच्या लोकांत ह्मणजे कोणी सुज्ञ असेल, असे त्यांचे मनांत देखील येत नाहीं. आणि हेच ते आपल्या विद्यार्थ्यांस पढवितात; आणि ते सर्वदा त्यांची स्तुति - करीत असतात. तेव्हां ते कसे चांगले निपजतील बरें ?
 ह्या राजपुत्राची आणखी एक गोष्ट सांगून हैं पत्र पुरें करितों. प्रवासाची आवड त्याला पराकाष्ठेची होती. चोवीस चोवीस तास एकसारखा घोडयावर बसून तो आपल्या राज्यांत फिरे. एके दिवशीं त्याने आपला घोडा भरधाव काढिला, तेव्हां त्याचे बरोबरचे . सरदार वगैरे सर्व मागे राहिले; आणि राजपुत्र एकटाच लांब गेला. त्याचे जवळ एक चोतकर भाकर मात्र होती; दुसरें कांहीं नव्हतें. जातां जातां अकस्मात् त्याचा घोड़ा, थोडी धडपड करून मेला. दुसऱ्या कोणालाही मार्गामध्ये असा प्रसंग पडता, तर खचीत तो