पान:मधुमक्षिका.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६५ )



दांत पडत नाहीत, हें तुह्मांला खरें तरी वाटेल काय ? मी आपल्या स्वतःच्या माहितीवरून खचीत सांगतों कीं, ह्या सर्व देशामध्यें फांस असा मला कोठेही आढळला नाहीं. त्यांच्या धर्माधिकाऱ्यांवर त्यांचा भाव आहे. ते त्यांस अति पवित्र, देवाचे प्रधान, व जनास सत्पथी लावणारे असे मानितात. व तेही त्यांस उत्तम प्रकारचा हितकारक बुद्धिवाद सांगतात.
 हे शरीरानें बरेच सुदृढ व देखणे आहेत. त्यांत • स्त्रियांपेक्षां पुरुष विशेष सुंदर आहेत. पुष्कळ लहान मुलगे मी पाहिले. त्यांत बहुतेकांचे केस पांढरे शुभ्र होते. ते मला केवळ मदनाच्या पुतळ्यासारखे दिसले. त्यांच्या मुखचर्या फार मनोरम होत्या. मुली पाहिल्या तों त्या सरासरीच होत्या. त्यांचीं शरीरें मुलांच्या शरी• रांइतकी नाजूक व कोमल नव्हतीं. ही गोष्ट सगळ्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर मोठी विलक्षणच समजली पाहिजे. कांकीं, असा प्रकार दुसऱ्या कोणत्याही देशांत पाहण्यांत येत नाहीं. शिवाय वायकांचे आंगावर बहु- धा खरूज असते. त्यांमध्ये स्कानिया येथील बायकांची तर खरजेविषयीं मोठी आख्या आहे. ह्याचा प्रत्यक्ष मला एकदां अनुभव आला. वाटेने जातांना आह्मी एका भटारखान्यांत उतरलों. तेथची धणीन तेथें बस- लेली माझ्या दृष्टीस पडली. ती इतकी सुस्वरूप होती की, तिचे वर्णन माझ्यानें करवत नाहीं. आपले तान्या- स स्तन पाजण्यासाठीं तिनें आपला पदर जरासा एकीकडे सारिला. तेव्हां तो अंतःकरणमोहक प्रदेश मीं पाहिला. तो तेथेही पराकष्ठेची खरूज माझ्या